रत्नागिरी, ०९ जून २०२५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरानजीकच्या प्रभाग क्रमांक १४ येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये नुकताच एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून, वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार, तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलचे पदाधिकारी विनायक हातखंबकर, सतीश दळी, भाजपचे कार्यकर्ते अमित विलणकर, माजी नगरसेविका सत्यवती बोरकर, माजी शहराध्यक्ष राजन फाळके, सचिन गांधी, मुकुंद विलणकर, विलास (अण्णा) विलणकर, सत्यवान शेठ बोरकर, भाई विलणकर, समीर वास्ता, आरबीआयचे अधिकारी श्री. कालेलकर, कमलाकर जोशी, मच्छिंद्र नागवेकर, उदयजी बसणकर, किशोर पावसकर, भालचंद्र विलणकर, अमेय घुडे, बबलू विलणकर, शहर सदस्या प्रतिभा नाखरेकर, मधुरा विलणकर, गणेशदादा विलणकर, अमित पावसकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्हाळे मॅडम, ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक पाटील, कृ. चिं. आगाशे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम मॅडम, बालविभागाच्या शिक्षिका असावरी पावसकर, अपर्णा गोगटे, तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 09-06-2025














