रत्नागिरी : शासन पहिली ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना लष्करी विषयांचे शिक्षण देणार आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांना लष्करी जीवनाचे महत्त्व आणि जबाबदाऱ्या समजतील. प्रश्न एवढाच आहे की, पहिलीच्या ऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात करणे योग्य होईल.
छोट्या विद्यार्थ्यांवर हा भार टाकू नये, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लष्करी जीवनाचे ज्ञान मिळेल आणि त्यातून लष्करीक्षेत्रात करिअर निवडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना लष्करी जीवनातील विविध पैलू जसे की, लष्करी शिस्त, नेतृत्व, संरक्षण यांसारख्या विषयांचे ज्ञान मिळेल.
विद्यार्थ्यांना लष्करी जीवनातील नैतिक मूल्ये आणि जबाबदाऱ्या समजावून दिल्या जातील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लष्करी जीवनातील विविध पैलूंची माहिती मिळेल. नेतृत्व आणि कौशल्ये विकसित होतील. विद्यार्थ्यांना लष्करी क्षेत्रात करिअर निवडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेची भावना विकसित होईल, याचे स्वागतच आहे. इस्त्रायलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षण दिले जाते. कोकणालाही लष्करी परंपरा लाभली असल्याने या निर्णयाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते, असे अॅड. पाटणे यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 10/Jun/2025














