साडवली : संगमेश्वर तालुक्यातील शिवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणे शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाच्या कोणत्याही हालचाली नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले आहेत. ११ जूनपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
या शाळेत सध्या २२ विद्यार्थी चौथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ तात्पुरती डागडुजी झाली होती; मात्र आता इमारतीत गळती सुरू असून, पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आहेत; पण शाळा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शाळा जीर्ण झाल्याने आणि शाळा कोसळून ठेवल्याने शाळा कुठे भरवायची, हा प्रश्न उभा ठाकला आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि शिक्षण विभागाकडे शाळेसाठी नवीन इमारतीसाठी तत्काळ निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. १० जूनपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ ११ जूनपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 10/Jun/2025














