लांजात भरदिवसा ॲक्टिव्हा चोरीला

रत्नागिरी, लांजा: लांजा येथे भरदिवसा दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. लांजा आड येथून एका अज्ञात चोरट्याने १०,००० रुपये किमतीची ॲक्टिव्हा (MH-08 AW-4370) चोरून नेली आहे. ही घटना ६ जून २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली.

कुलदीप नामदेव गायकवाड (वय ४०) यांनी या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा ६ जी डीएलएक्स (MH-08 AW-4370) लांजा आड येथे उभी केली होती. याच दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी त्यांच्या परवानगीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.

या घटनेची नोंद ९ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी गु.र.नं. ११७/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लांजा पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नागरिकांनी आपल्या वाहनांची काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणीच उभी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 10-06-2025