कोकण रेल्वेमार्गावर शनिवारी विशेष रेल्वे धावणार

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावर शनिवारी (ता. १४) मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन वनवे विशेष गाडी सोडली जाणार आहे. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी या गाडीला एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे.

कोकण आणि गोव्याचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. हे निसर्गसौंदर्य रेल्वे प्रवासातून अनुभवता यावे, यासाठी कोकण रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाडी सोडण्याची घोषणा केली आहे. या गाडीला चेअरकार, सेकंड सीटिंग या डब्यांसोबत एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, बिलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबेल.

ही गाडी मुंबई सीएसएमटी येथून सकाळी ७.३५ वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. या गाडीला एकूण १६ एलएचबी कोच, एक व्हिस्टाडोम कोच, तीन चेअरकार कोच, १० सेकंड सीटिंग कोच, एक एसएलआर कोच व एक जनरेटर कार उपलब्ध असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 PM 10/Jun/2025