राजापूरमध्ये गावठी हातभट्टीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल!

रत्नागिरी, राजापूर: राजापूर तालुक्यातील चिवारीणी येथे दत्ताराम सीताराम रेडीज (वय ६६) याच्या राहत्या घराच्या मागील बाजूला छापा टाकून पोलिसांनी सुमारे ९५० रुपये किमतीची ९ लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबासो पाटील (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी दत्ताराम सीताराम रेडीज याने ही दारू बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने परवान्याशिवाय आपल्या ताब्यात बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले.

या घटनेची नोंद ९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी करण्यात आली आहे. राजापूर पोलिसांनी गु.र.नं. ११३/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार दत्ताराम सीताराम रेडीज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-06-2025