रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे नूतन वास्तू निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. ह्या इमारती साठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. १९७ वर्षाचे हे वाचनालय १४ जानेवारी २०२७ रोजी द्विशताब्दी वर्षात पदार्पण करेल. याचे औचित्य साधत जीर्ण झालेल्या जुन्या वास्तूला निरोप देऊन नवीन इमारत आकार घेत आहे.
या नवनिर्माणकार्यासाठी समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी यथाशक्ती आर्थिक योगदान द्यावे असे विनम्र आवाहन करताना ग्रंथप्रासाद निर्माण निधी या नावाने निधी संकलन करण्याची मोहीम सुरू केली आहे. ग्रंथप्रेमी, संस्कृतीप्रेमी नगरजनांनी वाचनालयाची इमारत उत्तम उभी राहावी यासाठी भरीव आर्थिक योगदान द्यावे. ग्रंथप्रासाद निर्माण निधीला आयकर सवलत प्राप्त आहे.
या रचनात्मक कामासाठी जनतेने आर्थिक योगदान स्वेच्छेने द्यावे असे आवाहन सर्वांना करीत आहोत.
या ग्रंथालयाचा ग्रंथदेवघेव विभाग येत्या दीपावली पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सुसज्ज वाचनालयाच्या नवनिर्माणासाठी नागरिकांनी स्वेच्छेने पुढे यावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी या नावाने धनादेश अगर वाचनालयाच्या खात्यात आपली अमूल्य देणगी जमा करावी, असे आवाहन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष यांनी केले आहे.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या खात्याचा तपशील –
RATNAGIRI JILHA NAGAR VACHANALAY.
RATNAGIRI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD. RTN. (Savings Account)
A/c no.- 1611006022828, IFS Code – IBKL0574RDC
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-06-2025














