राजापुरात शेतशिवारे गजबजली

राजापूर : मे महिन्यातील धुमाकुळानंतर पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांसह नांगरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतशिवारही गरजबजून गेली आहेत. दरम्यान, रविवारी (ता. ८) रात्री विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामध्ये सागवे येथील विजय शंकर गावकर यांच्या घराची पावसामुळे पडझड होऊन सुमारे वीज हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मॉन्सूनपूर्व पावसानंतर नियमित पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातबियाणे पेरणी, नांगरणी आणि शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.

दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांनी नांगरणीसह पेरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतशिवारे गजबजली आहेत.

दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामध्ये सागवे खुर्द येथील विजय गावकर यांच्या घराची पडझड होऊन सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्यात केवळ ७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 10/Jun/2025