खेडमध्ये १२ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, हळहळ व्यक्त

रत्नागिरी, खेड: खेड येथील संजिवनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान १२ वर्षीय राजु ईश्वर पवार (रा. सुकीवली, बौद्धवाडी, ता. खेड) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजु पवार यास आजारपणामुळे उपचारासाठी संजिवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजुला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी पोलिसांना देण्यात आली. खेड पोलिसांनी याप्रकरणी आमृ. क्रमांक ६२/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. राजुच्या अकाली निधनाने सुकीवली बौद्धवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 10-06-2025