पाली : नियमित व्यायाम हा केला पाहिजे तसेच संतुलित आहारात आवश्यक पोषक घटक असावेत तसेच पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर आणि मन आराम करू शकतील. याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळेअंतर्गत नाटे उपकेंद्र येथे स्त्री रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. डॉ. कुमरे यांनी सांगितले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 10/Jun/2025














