रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. स्पर्धेत गोल्डन ग्रुपमध्ये डॉ. हजिरनिस यांच्या टीमने विजेतेपद पटकावले, तर सिल्व्हर ग्रुपमध्ये बोरिवली स्पोर्टस् क्लबने विजेतेपद मिळवले.
साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये दोन दिवस या स्पर्धा पार पडल्या. गोल्डन ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक डॉ. हजिरनीस, आर. श्रीधरन, पी. हेगडे, आर. गुळवणी व व्ही. जी. दक्षिणदास यांच्या संघाने मिळवला, द्वितीय क्रमांक हेमंत पांडे व सहकाऱ्यांच्या डॅझन संघाने, तृतीय क्रमांक अनिरुद्ध संझगिरी यांच्या फ्रेनमेस, चौथा क्रमांक वरसले यांच्या जाम संघाने, पाचवा क्रमांक जे. के. भोसले यांच्या अमनोरा संघाने आणि सहावा क्रमांक रत्नागिरीच्या मोहन दामले, अभय पटवर्धन, माधव आगाशे व अभय लेले यांच्या श्री मँगो संघाने मिळवला, विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सिल्व्हर ग्रुपमध्ये एस. व्ही. खानोलकर यांच्या बोरिवली स्पोर्टस् क्लबने प्रथम क्रमांक, संजय वैद्य यांच्या गणेश सांगली संघाने द्वितीय, तर देशमुख यांच्या पल्स ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेकरिता भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, राजापूर, देवगड, सावंतवाडी व यजमान रत्नागिरीमधील २१ संघ सहभागी झाले. स्पर्धा संचालक म्हणून दक्षिण दास आणि राजीव देव यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, स्पर्धा कमिटीतील अभय लेले, चिंतामणी दामले, सचिन मुळे, विनायक मुळे यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 10/Jun/2025














