रत्नागिरीतील मारूती आळी रस्त्याची दुर्दशा

रत्नागिरी : शहरातील मारुतीआळीमध्ये मुख्य रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्याने रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मारुतीआळी येथील व्यापारी तसेच नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळेच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

रत्नागिरी शहरातील बऱ्याचशा प्रभागात रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. एक महत्त्वाचा भाग म्हणजे मारुती आळी परिसर आहे. मारुती आळी म्हणजे संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील लोक या ठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येतात. मारुती आळीमध्ये अनेक मोठमोठी व्यापारी संकुले आहेत. मारुती मंदिर आहे. मात्र सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचलेले असते. त्यामुळे या खड्ड्यातील चिखल पादचाऱ्यांच्या अंगावर उडतो. रत्नागिरी पालिकेने पावसापूर्वी खड्डे भरले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 10-06-2025