रत्नागिरी : महावितरणचा आज अंतिम डिजिटल लकी ड्रॉ

रत्नागिरी : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा तिसरा व अंतिम लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने १० जून रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिला जाणार आहे, तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी २ प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

७ एप्रिल व ७ मे रोजीच्या पहिल्या व दुसऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग ३ वेळा ३ पेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पध्दतीने भरणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 10/Jun/2025