खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवट स्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्तेदेखील अधिक धोकादायक ठरत आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळण हे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. या घाटातून वाहने हाकताना वाहनचालकांना जपून वाहने हाकावी लागत आहेत.
सद्य स्थितीत भोस्ते घाटातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. परशुराम घारातील काम अर्धवट स्थितीत आहे. कसेही पाटाला पर्यायी बोगदा काढण्यात आला आहे. हे सारेच सगळे सुरळीत दिसत असले तरीदेखील या घाटातील अवघड वळणे जीवघेणी असून, पावसाळ्यात या वळणाचा अधिक धोका संभवतो. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचादेखील धोका आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात घाटातून प्रवास बिकटच म्हणावा लागेल गतवर्षीच्या पावसाळ्यात भोस्ते घाटात अनेकदा दरड कोसळल्याचे प्रकार वाढले होते.
त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती. कशेडी घाटात पोलादपूर हद्दीत भोगावनजीक थोड्याफार प्रमाणात रस्ता दरवर्षीष खचतो आहे. यावर्षीही परिस्थिती वेगळी नाही; परंतु कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्याचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे तितकासा गंभीर प्रश्न उद्भवणार नाही मात्र यावर्षीही महामार्गावरील भोस्ते, परशुराम घाटात वारंवार दरड कोसळून घाट वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काढण्यात आलेल्या गटारामधून साचलेला कचरा काढण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
या मार्गावरील भोस्ते, पशुराम हे घाट नागमोडी वळणांमुळे धोकादायक मानले जातात. या घाटत पावसाळ्यात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत तसेच गेल्या तीन-चार वर्षात या भोस्ते-परशुराम या दोन्ही घाटातून रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे इालेल्या डोगरकटमुळे दरडीचा धोका अधिक आहे. चौपदरीकरणानंतर भोस्ते घाटातीत धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. या घाटातील एक अवघड वळण काढण्यात आले असले तर दूसरे अवघड काम ठेकेदाराने आणखीनच अवघड करून ठेवल्याने या वळणावर दर दोन दिवसांआड अपघात होत आहेत गेल्या वर्षभरात या वळणावर अंदाजे ५० ते ६० अपघात झाले आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. अन्य तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलदगतीने केले असले तरी संपूर्ण ४४ किलोमीटरच्या ररस्त्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. कशेडी घाटाच्या पायथा ते भरणेनाका दरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात रस्ता समपातळीत ठेवण्यात ठेकेदार कंपनीला अपयश आले आहे. परिणामी, या दरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरून धावणारी वाहने आदळत आपटत असल्याने चौपदरीकरणापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणायची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
या अवघड वळणावर आम्ही गतिरोधक बसवले आहेत. तसेच तीव्र उतार वाहने सावकाश हाका, अशा आशयाच्या सूचनाफलक देखील लावले आहेत हे वळण पूर्वी छोटे होते. त्या ठिकाणी अपघात होत असत म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तेथील रस्ता रुंद केला आहे. हे वळण काढण्यासाठी शासकीय स्तरावर ४० कोटींचा निधी मंजूर झाला असून, पावसाळ्यानंतर अवघड वळण काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे – पंकज गोसावी,अभियंता, राष्ट्रीय बांधकाम विभाग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 10/Jun/2025














