लांजा : आगवे ग्रामपंचायत येथे टीबी मुक्त मोहिम

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील मोरेवाडी समाजमंदिर आगवे, ता. लांजा येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत 2025 मोहिमेच्या अनुषंगाने ग्रामस्थांची एक्स रे तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत समाजसेवक मा. संदीप कि. गुरव यांनी केले. श्री. रविंद्र कृष्णा मोरे व सुखादेवी भक्त मंडळ आगवे यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य केले.

ग्रामस्थांना या शिबीरामध्ये BP, शुगर, रक्त, लघवी, स्पुटम तपासणी इत्यादी मोफत सेवा देण्यात आल्या. सदर कार्यक्रम ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. प्रफुल्ल चं. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

DTC आरोग्य सहाय्यक श्री. मंगेश पाटील साहेब यांनी कीटकजन्य व जल जन्य आजाराबाबत घ्यायवाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरास DPS श्री. एन. वाय. सुर्वे साहेब, श्री. निलेश हंगे (एक्स रे टेक.), श्री. मिलिंद संसारे सर (STS), श्री. मिथिन मयेकर सर (लॅब.टेक.), श्री. डी. व्ही. गुरव आरोग्य निरीक्षक प्रा. आ. केंद्र वाडीलिंबू, गटप्रवर्तक श्रीम.एस.एस. लोटणकर, आरोग्य कर्मचारी PHC वाडिलिंबू, वाडीलिंबू कार्यक्षेत्र आशाताई, आगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्र अंगणवाडी व मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, उपसरपंच,, सामाजिक कार्यकर्ते व आगवे-जोशीगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 10/Jun/2025