गुहागर : गुहागर तालुक्यातील साखरीत्रिशूळ सुतारवाडी येथील एसटी स्टैंड ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरपंच सचिन म्हस्कर यांच्याहस्ते करण्यात आले.
या रस्त्याची मागणी सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आ. डॉ. विनय नातू यांच्याकडे केली होती. त्यानुसार निलेश सुर्वे यांनी पाठपुरावा करीत भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यामार्फत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे संपर्क साधत जिल्हा नियोजनमधून रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 14/Oct/2024










