रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गुरव समाज बांधवांनी सहभाग घेतला.
गुरव समाजातील पोटजातींचा इतर मागासवर्ग प्रवर्गात अनुक्रमे 43 मध्ये नोंद घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
गुरव समाज आणि पोटजातींसंदर्भातील विषयावर चर्चा करून मंडल आयोगाच्या सदस्यांनी आवश्यक कागपत्रे लवकरच सादर करण्यास सांगितले. आवश्यक असलेले दस्तऐवज लवकरच सादर करू, असे राजन गुरव यांनी योग्य बाजू मांडून सांगितले. या कामासाठी मुंबईतील हितवर्धक गुरव समाजामार्फत पुढाकार घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात हितवर्धक गुरव समाज संस्था संस्थापक अध्यक्ष राजन गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी, गुरव समाज उपाध्यक्ष महेश गुरव, सचिव मोहित चव्हाण, उपसचिव संतोष साळवी, सदस्य गोविंद गुरव, तसेच गुरव ज्ञाती समाज संस्थेचे विश्वस्त शंकर गुरव, सचिव अनंत बाळाजी गुरव, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ए. के. गुरव, सदस्य धनंजय गुरव, जितेंद्र गुरव, स्वप्नील गुरव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 11-06-2025














