संगमेश्वर : सायले बौद्धवाडी येथे गवारेड्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सायले बौद्धवाडी येथे गवारेड्याचे दर्शन झाल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायले परिसरात गवारेडा भर रस्त्यात निर्भीडपणे वावरताना ग्रामस्थांना दिसू लागला आहे. भलामोठा गवा रेडा रस्त्यात दिसताच ग्रामस्थांची भीतीने गाळण उडत आहे. वनविभागाने गव्याच्या या मुक्त संचाराची दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. हा गवारेडा सायले बौद्धवाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 11/Jun/2025