संगमेश्वर : तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हॉल येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने रिक्षा मालक चालक संघटना कडवई, तुरळ-चिखलीच्या सदस्यांना रस्ते सुरक्षा अभियान २०२४ च्या अनुषंगाने रस्ते अपघात व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्यत्वाचे अर्ज वितरित करण्यात आले.
कडवई येथील ग्रामपंचायत हॉल येथे रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखलीच्या सदस्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने रस्ते अपघात व सुरक्षा व कल्याणकारी मंडळ या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, सहायक मोटर वाहन निरीक्षक सुशांत पाटील, मोहसीन आवटी, अवधूत कुंभार हे उपस्थित होते.
सुरवातीला रिक्षासंघटनेच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी रस्ते सुरक्षा अपघात व रिक्षा व्यवसाईकांची कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी साठ रिक्षा व्यवसाईकांनी कल्याणकारी मंडळाच्या सदस्यत्वाचे अर्ज भरले. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी संघटने बाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संदीप चिले, कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे व सर्व सदस्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 14/Oct/2024














