लांजा: मुंबई-गोवा हायवेवर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत शंकर खानविलकर (वय ६५, रा. गोळवशी, धामनवाडी ता. लांजा) यांनी त्यांच्या मालकीची सुंदाई एलांड्रा (MH०२ DW ५२४७) ही चारचाकी गाडी रस्त्यात अशा पद्धतीने लावली होती की, त्यामुळे हायवेवरून ये-जा करणाऱ्या लोकांना आणि वाहनांना धोका निर्माण होत होता, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच, लांजा पोलीस ठाण्याचे किशोर संतराम पवार (पोशि/९००) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार, लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा क्र. ११८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 11-06-2025