देवरुखमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख बाजारपेठेत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर देवरुख पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई काल, १० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास देवरुख बाजारपेठेतील लक्ष्मी बेकरी दुकानाच्या इमारतीजवळील गल्लीत, आनंद सार्दळ यांच्या इमारतीच्या पाठीमागे करण्यात आली.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी प्रकाश नाना कदम (वय ४५, रा. देवरुख, आंबेडकरनगर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी प्रशांत सदानंद नागवेकर (वय २९, पोकों/१४२३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रकाश कदम हा कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोकड आपल्या ताब्यात बाळगून विनापरवाना मटका जुगार चालवत असताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ८३२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ८३० रुपये रोख रक्कम आणि २ रुपये किमतीचे इतर साहित्य समाविष्ट आहे.

या घटनेचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 11-06-2025