रत्नागिरी : शहरातील काही भाग सध्या बॅनरबाजीमुळे वेढले गेले आहेत. एकावर एक उंच बॅनर लावले जात आहेत. सध्या पावसाळी वातावरण असून, या भागात वारेही वेगाने वाहत असतात. त्यामुळे उंचावरील बॅनर पडून अपघात होऊ नये यासाठी नगर परिषदेने उंचावरील बॅनर हटवण्यास सांगितले होते. पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे मुंबईत बॅनर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी बॅनर उभारणाऱ्यांनी लोखंडी सांगाडे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात एकूण २४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर पुढील दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.
रत्नागिरी शहरात साळवी स्टॉपपासून अगदी पेठकिल्ला नाक्यापर्यंत अनेक ठिकाणी एकावरएक बॅनर उभारण्यात आले आहेत. विशेषतः मारुती मंदिर, माळनाका, जेल रोड, जेलनाका, जयस्तंभ, आठवडा बाजार परिसरात मोठ्याप्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत. काही बॅनर एकावर एक उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी हे किनारपट्टीवर असल्याने पावसाळ्यात वारेही वेगाने वाहत असतात, त्यामुळे बॅनर पडून मुंबई सारखा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उंच बॅनर हटवण्याचा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. डबल बॅनर उभारणाऱ्यांना ते बॅनर हटवण्याची सूचना नगर परिषदेकडून देण्यात आली होती.
मंगळवारी सकाळपासून हे बॅनर हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील जयस्तंभ येथील एकावर एक असणारे बॅनर काही उतरवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 11/Jun/2025














