चिपळूण, (दि. ११ जून): चिपळूण शहरातील खाटीकगल्ली, मटण मार्केटजवळ सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, १० जून २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रघुनाथ कदम (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लकीराम दामु कुंभार (वय ६०, रा. तटकरी बाग, पेटमाप, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा खाटीकगल्ली येथील दुकानांच्या बाजूला दैनिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘कल्याण मटका’ नावाच्या जुगाराचे आकडे घेऊन लोकांकडून पैसे स्वीकारत होता. तो स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय हा जुगार खेळ खेळत असताना मिळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ९६०/- रुपये रोख रक्कम आणि १५/- रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ९७५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३७/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 11-06-2025














