Aus vs SA WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून (11 जून) सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका (South Africa vs Australia WTC Final 2025) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने त्यांच्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियासोबत, दक्षिण आफ्रिकेनेही काल त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. हा अंतिम सामना 11 जून ते 15 जून दरम्यान खेळला जाईल, ज्यासाठी एक दिवसाचा राखीव दिवस (16 जून) निश्चित करण्यात आला आहे.
अंतिम सामन्यात हवामान कसे असेल?
आज, बुधवार, 11 जून रोजी येथे ढगाळ वातावरण असेल. परंतु सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. तथापि, हवामान खात्याने शुक्रवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दक्षिण आफ्रिकेची Playing XI:
रियान रिकेलटन, एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), वियान मुल्डर, ट्रेस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (यष्टिरक्षक), मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
ऑस्ट्रेलियाची Playing XI:
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
SA विरुद्ध AUS WTC फायनल कोणत्या ठिकाणी खेळला जाईल?
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC World Test Championship चा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.
SA विरुद्ध AUS WTC फायनलचा टॉस भारतात किती वाजता होईल?
भारतीय वेळेनुसार, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचा टॉस दुपारी 2.30 वाजता होईल.
भारतात SA विरुद्ध AUS WTC फायनल किती वाजता सुरू होईल?
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना बुधवार, 11 जून रोजी दुपारी 3 वाजता सुरू होईल. सामना दररोज दुपारी 3 वाजता सुरू होईल.
भारतात SA विरुद्ध AUS WTC फायनल सामना कोणता चॅनेल थेट प्रसारित करेल?
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.
भारतात SA विरुद्ध AUS WTC फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या अॅपवर असेल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात JioHotstar वेबसाइट आणि JioHotstar अॅपवर असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 11-06-2025














