रत्नागिरी ‘डायट’ प्रशासनाची शिक्षकांवरील हुकूमशाही त्वरित थांबावी : शिक्षक भारती

कडवई : सध्या माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांसाठी रत्नागिरीत एकाच ठिकाणी सुरू आहे. यामुळे शिक्षकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्याशिवाय डायटच्या प्रशासनाकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना वागवले जात आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तालुकावार प्रशिक्षण केंद्र देऊन शिक्षकांना सोयीनुसार चांगले प्रशिक्षण देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिक्षक भारतीतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा – कार्यवाह नीलेश कुंभार यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, – आत्तापर्यंत दरवर्षी विविध शिक्षक – प्रशिक्षणासाठी तालुकावार किंवा दोन-तीन तालुक्यासाठी १ शिक्षक प्रशिक्षण – केंद्र मंजूर करण्यात येत होती. त्यामुळे शिक्षकही वेळेत हजर राहून प्रशिक्षण – घेत होते. मात्र सध्या डायटने संपूर्ण जिल्ह्यातील ९ तालुक्यांसाठी केवळ एकच प्रशिक्षण केंद्र व तेही रत्नागिरीत – ठेवून एकांगी कारभार सुरू केला आहे. – याबद्दल शिक्षकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकाच केंद्रामुळे शिक्षकांना दूरदूरच्या डोंगरातून व खेडेगावातून प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागते. शिक्षकांना रत्नागिरीत निवासाची सुविधा नाही. प्रशिक्षणा दरम्यान कोणताही भत्ता नाही, आवश्यक सोयी सुविधा नाहीत. अत्यंत अडचणीच्या स्वरूपात हे प्रशिक्षण राबवले जात आहे.

हे प्रशिक्षण विभागवार दोन-तीन तालुक्यासाठी १ प्रशिक्षण केंद्र राबवून करण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. जर मागणी मंजूर झाली नाही तर शिक्षक भारती जिल्हास्तरावर शिक्षकांचा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करेल असे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

नुकताच निवळी येथे शिक्षकांच्या गाडीला झालेला अपघात ज्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याला प्रशासनाचा अडेलतट्टपणा आणि चुकीचे धोरण कारणीभूत आहे. जर अनेक प्रशिक्षण केंद्र असती तर शिक्षकांच्यावर ही आपत्ती ओढवली नसती.

शिक्षकांना प्रवासासाठी प्रचंड खर्च करायला लावून, शिक्षकांच्यावर आर्थिक अन्याय केला जात आहे. याबाबत डायटचे प्रशासन मात्र ढिम्मपणाने पाहत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिक्षक भारतीने व्यक्त केली आहे. भविष्यात या धोरणात सुधारणा व्हावी. अन्यथा डायटच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आला आहे.

शिक्षकांना वेठीस धरण्याचा हेतू : संजय पाथरे
शिक्षकांसाठी निवासाची सोय उपलब्ध नसल्याने आणि एकच केंद्र असल्याने शिक्षकांना दूरदूरच्या ठिकाणाहून रत्नागिरीत यावे लागते. त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याबाबत कुठलाही गांभीयनि व सद्भावनेने विचार केला जात नाही. निव्वळ शासनाचे अनुदान खर्ची टाकणे आणि शिक्षकांना वेठीस धरणे एवढाच हेतू प्रशासनाचा दिसून येतो काय? असा सवाल जिल्हा अध्यक्ष संजय पाथरे यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 11/Jun/2025