साखरपा : कर्ज व्यवहारात तारण ठेवलेले सोने पैसे भरुनही बँकेकडून परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार कोंडगाव बाजारपेठेतील व्यापारी लक्ष्मण कदम यांनी बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.
कोंडगाव बाजारपेठेतील व्यापारी लक्ष्मण कदम यांनी बँक ऑफ इंडिया साखरपा शाखेत ३,०५,१०० रुपयांचे सप्टेंबर २०२३ मध्ये सोनेतारण कर्ज घेतले. त्य नंतर ५ ऑक्टोबरला बँकेत जाऊन मला माझे कर्ज फेडण्यासाठी किती रक्कम लागेल याबाबत बँक व्यवस्थापक अश्विनी देसाई यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ३,२०,००० इतकी रक्कम खात्यात व २०००० बँकेत जमा करण्यास सांगितले व तुमचे सोने त्याच दिवशी देण्यात येईल, असे सांगितले. त्याप्रमाणे कदम यांनी रक्कम बँकेत भरली. मात्र, त्यावेळी मला पावतीही देण्यात आली नाही. ती पावती ९ ऑक्टोबरला देण्यात आली. मात्र, सोने परत देण्यात आले नाही. या नंतर बँकेच्या मॅनेजर सुट्टीवर आहेत, त्या आल्यानंतर तुमच्या विषयावर विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र सुमारे ८ दिवसापेक्षा अधिक कालावधी होऊन गेल्यानांतर व पैसे भरून देखील सोने परत न मिळाल्याने त्यांनी बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:02 14-10-2024