रत्नागिरी : आंबा मोसमात आपापल्या गावी गेलेले इतर फळ व्यावसायिक रत्नागिरीत परतले आहेत. या सर्व फळ विक्रेत्यांनी शहरातील बाजारपेठेसह जेलरोड, जयस्तंभ, मारुती मंदीर आदी ठिकाणी फळ गाड्या सुरु केल्या आहेत.
आंबा मोसमात सफरचंद, चेरी, चिकू, पेरु, केळी व इतर फळांना फारशी मागणी नसते. त्यामुळे परप्रांतातून फळविक्रीसाठी रत्नागिरीत आलेले तरुण आंबा मोसम सुरु झाल्यानंतर आपापल्या गावी जातात, परंतु यावर्षी आंबा मोसम लवकर संपल्याने आणि वटपौर्णिमेला फळांची मागणी असल्याने हे सर्व तरुण पुन्हा रत्नागिरी शहरात परतले आहेत.
परप्रांतीय फळविक्रेते एप्रिल-मे महिन्यात आपापल्या गावी जातात आणि गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरीत परततात. यावर्षी मात्र बहुसंख्य फळविक्रेते जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आले आहेत. यासर्वांनी शहरात जागा मिळेल तिथे फळांचे स्टॉल, हातगाड्या उभ्या करून व्यवसाय केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 11/Jun/2025














