लांजा : लांजा पोलिस स्थानकातील हेडकॉन्स्टेबल सचिन सुरेश भुजबळराव यांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या बढतीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
सचिन भुजबळराव हे संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रहिवासी आहेत. त्यांनी सन १९९६ पासून पोलिस दलात सेवा सुरू केली. त्यांनी आपल्या २९ वर्षांच्या सेवेत चिपळूण, संगमेश्वर, देवरूख येथे सेवा बजावली आहे. सध्या ते लांजा पोलिस स्थानकात कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्यात लेखनीक म्हणून कामगिरी करताना तपासातही अधिकाऱ्यांना मदत केली.
त्यांची पोलिस हेडकॉन्स्टेबल
पदावरून सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व सहायक पोलिस फौजदार अरविंद कांबळे यांनी सचिन भुजबळराव यांना स्टार लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे व महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल साक्षी भुजबळराव उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 11/Jun/2025














