दाभोळ येथे जीर्ण वीज खांब धोकादायक

दापोली : दाभोळ येथील साई मंदिर परिसरात ११ केव्ही वीज वाहिनीवरील गंजलेल्या व जीर्ण धोकादायक वीज खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे खांब कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. मात्र, याचा फटका परिसरातील तीन ते चार गावांना बसणार आहे.

त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका असल्याने याबाबत दाभोळ ग्रामपंचायतीच्यावतीने दापोली तहसीलला निवेदन देण्यात आले आहे. यात प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेले आणि गंजलेले खांब बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्याचा धोका निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 11/Jun/2025