Ratnagiri : एसटीच्या शिवाई बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

रत्नागिरी : एसटीच्या शिवाई प्रकारातील इलेक्ट्रिक श्रेणीमध्ये ‘ई शिवाई’ बसेस नावाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत.

प्रदूषणविरहित चार्जिंगवर चालणाऱ्या ई शिवाई एसटी गाड्यांचा ‘फर्स्ट लूक’ राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी खुला केला आहे.

याआधी पूर्वीच्या लाल परीला जवळचा वाटेल अशा रंगसंगतीमध्ये अलीकडेच एसटीने अधिक आरामदायी गाड्यांची श्रेणी प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे. आता पर्यावरणपूरक ई शिवाई बसेसदेखील लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. हिरव्या रंगसंगतीमध्ये या गाड्या असतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 14-10-2024