राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी संगमेश्वरातील आयुष माचिवले याची निवड

देवरूख : चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयुष माचिवले याची १८ वर्षे वयोगटात रत्नागिरी संघात निवड झाली आहे.

मुला-मुलींचे संघ दि. १४ ते १८ जून रोजी पुणे-बाणेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सध्या आयुष माचिवले हा बारावी कला शाखेमध्ये शिकत आहे. त्याला विद्यालयाचे शिक्षक सुहास पाब्ये व सुरेंद्र कुळ्ये यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याच्या निवडीबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष राजाराम गर्दै, शांताराम भुरवणे, सचिव शरद बाईत, संचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, ललित लोटणकर, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 11/Jun/2025