४४६ मंदिरे, ११०० घरे, २३०० दुकाने पाडणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण ? : अनिल गोटे

मागील काही दिवसांपासून धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे आणि भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. अग्रवाल यांनी अतिक्रमण काढण्यावरुन गोटे यांना अफजल म्हणत डिवचले होते.

आता अनिल गोटे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले.”धुळ्यातील भाजपच्या नेतृत्वाने मला अफजल खान म्हटले. पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरू म्हणवून घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे एक छत्रीय मालक, यांनी देशातील ४४६ मंदिरे, वाराणसीत २८६ मंदिरे पाडली आहे, पाच हजार वर्षे जुने भारत माता मंदिर सुद्धा, या भारत मातेच्या पुत्राने सोडले नाही”, अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपावर केली.

मागील काही दिवसांपासून भाजपा आमदारा अनुप अग्रवाल आणि माजी आमदार गोटे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल अग्रवाल यांनी केलेल्या टीकेला गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, “धुळ्यातील भाजपच्या नेतृत्वाने मला अफजल खान म्हटले. पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरू म्हणवून घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे एक छत्रीय मालक, यांनी देशातील ४४६ मंदिरे, वाराणसीत २८६ मंदिरे पाडली आहे, पाच हजार वर्षे जुने भारत माता मंदिर सुद्धा, या भारत मातेच्या पुत्राने सोडले नाही. अन्य असंख्य मंदिरे ही हजारो वर्षांपूर्वीची होती. पण याचा किंचितही विचार न करता, त्यांनी सदर मंदिरे परमेश्वराच्या परम पवित्र मुर्त्यांसकट नरेंद्र मोदींनी मिटवून टाकली, असा आरोप गोटे यांनी केला.

“माझ्या कारकिर्दीत प्रार्थना स्थळांचे अतिक्रमण, केवळ वाहतूक सुरळीत होण्याकरिता, दूर करणारा मी जर अफजल खान आहे, तर मंदिरे, घरे व दुकाने पाडणाऱ्या मोदींना आता तुम्ही चंगेजखान म्हणणार का?, असा सवालही माजी आमदार गोटे यांनी आमदार अग्रवाल यांना केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 11-06-2025