रत्नागिरी : वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, वन्य प्राण्यांची शिकार केल्यास जबर दंड आणि कोठडीची शिक्षा होऊ शकते. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तीन ते सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि लाखापर्यंत दंड किवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. काही वेळा अंधश्रद्धातूनही शिकार केली जाते.
वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार, वन्य प्राण्यांची शिकार करणे, पकडणे किंवा मारणे हे बेकायदेशीर आहे. भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे आहे, हा या कायद्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
वन्यजीवांची शिकार करण्यामागे कोणता हेतू?
अनेकदा मानवी गरजा आणि आर्थिक स्वार्थासाठी वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. वन्य जीवांचे मांस, कातडे, शिंगे आणि इतर उत्पादने यांची तस्करी करण्यासाठी त्यांची शिकार केली जाते. मात्र, यामुळे वन्यजीव प्रजाती कमी होऊन पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृती महत्त्वाची
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी लोकांमध्ये वन्यजीवांचे महत्व याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. तरच वन्यप्राण्यांच्या शिकारी थांबतील. यासाठी वन विभागाकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.
समाजातील अंधश्रद्धा वन्यजीवांच्या मुळावर
समाजात वन्य जीवांशी निगडीत बळी देणे, पारथ करणे, प्राण्यांचे दात, नखे घरात ठेवणे अशा अनेक अंधश्रद्धा समाजात अजुनही पाळल्या जातात. यातूनच वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच काही हौसेपोटी किंवा मांसासाठी वन्य प्राण्यांची शिकार करतात. अशांवर वन्य जीव कायद्यान्वये कारवाई होते.
वन्यजीव संरक्षण अधिनियम काय सांगतो?
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, वन्य प्राण्यांची शिकार केल्यास जबर दंड आणि कोठडीची वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार, वन्य प्राण्यांची शिकार करणे, पकडणे किंवा मारणे हे बेकायदेशीर आहे.
वन्यजीवांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मात्र, समाजातील अंधश्रद्धातून वन्यजीवांची शिकार केली जाते. तसेच त्यांच्या अवयवांची तस्करी केली जाते. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी वन्यजीवांच्या विविध श्रेणीनुसार ३ ते ७ वर्षे कारावास किंवा लाखापर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. वन्यजीव कमी झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याबाबत समाजात जागृती व्हायला हवी- प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 11/Jun/2025














