हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर, आजची रात्रदेखील फार खास असणार आहे कारण आज स्ट्रॉबेरी मून दिसणार आहे. त्यानंतर 2043 ला असं दृष्य पुन्हा पाहण्यास मिळेल.
त्यामुळे आजची रात्र फार खास असणार आहे.
स्ट्रॉबेरी मून भारतासह देशभरातील काही शहरांत, देशात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जरा सूर्यास्त होईल तेव्हा रात्र व्हायच्या आधीच पौर्णिमेचा चंद्र खास दिसणार आहे.

मात्र, आजचा चंद्र नेहमीसारखा नसून तो हलकासा चमकदार दिसणार आहे.
खरंतर, याचा रंग स्ट्रॉबेरीसारखा नसतो. पण, याचं नाव अमेरिकन आदिवासी परंपरेशी संबंधित आहे.
या ठिकाणी जून महिन्यात स्ट्रॉबेरी काढण्याची सुरुवात याच पौर्णिमेनंतर होत होती. या दरम्यान चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर असतो. त्यामुळेच तो फार छोट्या आकाराचा दिसतो.

भारतात स्ट्रॉबेरी मून तुम्ही सूर्यास्तानंतर दक्षिण-पूर्व दिशेला पाहू शकता. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरु सारख्या शहरात संध्याकाळी 7 वाजता हा मून तुम्हाला दिसेल.
हजारो वर्षांनंतर हा अद्भूत अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी सोडू नका. हा अनुभव तुम्ही दुर्मिणीने देखील घेऊ शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 11-06-2025














