रत्नागिरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा पुरुष आणि स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान उशिरा झाल्यास उपचारात अनेक अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी आणि कॅन्सरचे वेळेत निदान व उपचार व्हावेत या उद्देशाने, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यात “कॅन्सर डायग्नोस्टिक कॅम्प” चे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात अत्याधुनिक कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन आणि गर्भाशयमुख कॅन्सरच्या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान करून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

शिबिराचे ठिकाण आणि वेळापत्रक:

सोमवार, १६ जून २०२५: वाटद PHC (सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.)
मंगळवार, १७ जून २०२५: कोतवडे PHC (सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.)
बुधवार, १८ जून २०२५: पाली ग्रामीण रुग्णालय (सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.)
गुरुवार, १९ जून २०२५: स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी शहर (सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.)
शुक्रवार, २० जून २०२५: चांदेराई PHC (सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.)
या शिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांशी किंवा उदय सामंत प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 12-06-2025