रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अत्याधुनिक नवीन एसटी बसस्थानक उभारल्यामुळे सर्वच वाहतूक नव्या बसस्थानकातून सुरुवात झाली होती. मात्र, जुने रहाटाघर बसस्थानक ओस पडले होते. येथील गाळेधारकांचे ही हाल झाले होते. प्रवासी, गाळेधारकांचा विचारकरून, याची दखल घेत अखेर रत्नागिरी आगाराने लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटाघर या जुन्या बसस्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला असून मुंबई, पुणे, कोल्हापूर, तुळजापूर, सोलापूर या लांबपल्ल्याच्या गाड्या आता जुन्या रहाटाघर बसस्थानातून धावत आहेत.
रत्नागिरी शहरात हायटेक अन सुसज्ज असे नवीन एसटी बसस्थानक उभारले असून नवीन बसस्थानकात वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. नव्या बसस्थानकाचे रत्नागिरीकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. खाली शहरातील वाहतूक व पहिल्या मजल्यावर सोलापूर ग्रामीणमधील वाहतूक सुरू होती. त्यामुळे या बसस्थानकावर मोठी गर्दी होत होती. दुसरीकडे जुने रहाटाघर बसस्थानक सामसूम झाले होते. पूर्वी जुन्या बसस्थानकावर मोठी गजबज, गर्दी व्हायची मात्र आता शुकशुकाट झाली आहे. वाढती गर्दी तसेच गाळेधारकांचा प्रश्न ही ऐरणीवर आला होता. जुन्या बसस्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करा अशी मागणी ही प्रवाशांची होती. अखेर रत्नागिरी आगाराने लांब पल्ल्याच्या गाड्या जुन्या रहाटाघर बसस्थानकातून धावणार असा निर्णय घेतला असून प्रत्याक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, बोरिवली या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवासींनी आता नव्या ऐवजी जुन्या बसस्थानकावर जावावे लागणार आहे. जुन्या रहाटाघर बसस्थानकात आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे.
गाळेधारकांचा प्रश्न मार्गी
जुन्या रहाटाघर बसस्थानकावर टपरीवाले, हॉटेल, उपहारगृह, शिक्षा चालक होते त्याठिकाणी त्यांचा चांगला जम बसला होता. नव्या बसस्थानकामुळे कोणी फिरकत नव्हते. व्यवसाय होत नव्हते. त्यामुळे आमचे कसे होणार, इथून कोठे जावे लागणार असा विचार करून व्यापारी चिंतेत होते. अखेर लांब पल्लच्या गाड्या जुन्या बसस्थानावरून जाणार असल्यामुळे गाळेधारकांचा ही प्रश्न मिटला असल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.
प्रवासी, गाळेधारक, झालेली गर्दीचा विचार करून लांब पल्ल्याच्या गाड्या आता जुने बसस्थानक रहाटाघर येथून धावत आहेत. मागील काही दिवसांपासून जुन्या बसस्थानकावर ही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. –बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 PM 12/Jun/2025














