रत्नागिरी : डाक विभागाची २६ जून रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा २६ जून रोजी दुपारी ३ वाजता विभागीय डाक कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी आपला अर्ज ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे २० जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. मुदती नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी सर्व तपशीलासह केलेला असावा. पेन्शन अदालमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 12/Jun/2025