चिपळूण : मजरेकाशी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गावातील विकासकामांसाठी निधी दिल्याबद्दल आ. निकम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच प्रणाली पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष अब्दुल वहाब सुर्वे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पोलिस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख सैफ सुर्वे, मजरेकाशी मुस्लिम जमातचे अध्यक्ष शकील सुर्वे, विलास पेडणेकर, दिलीप पेडणेकर, बावा पेडणेकर व मजरे काशी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 14/Oct/2024









