चिपळूणमध्ये हातभट्टी दारूविक्री करणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील गोंधळे, करंबेली येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेकडून ७५० रुपये किमतीची ७ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. ही घटना दि, ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित संतोष कदम (पोहेकॉ/१३९४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोंधळे, करंबेली येथील एका घरासमोर असलेल्या चिऱ्याच्या बांधाखालील मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेने बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, महिलेच्या ताब्यात ७ लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आली. या दारूची किंमत अंदाजे ७५० रुपये आहे.

याप्रकरणी, आरोपी महिलेविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदणी क्रमांक १३८/२०२५ असून, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 12-06-2025