गुहागर : गुहागर तालुक्यातील कोंढर काळसुर येथील बीएसएनएल टॉवरच्या अँगलला एका २२ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि, ११ जून २०२५ रोजी दुपारी ११ ते २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढर काळसुर येथील फौजदारवाडी येथील रहिवासी पुरुषोत्तम उर्फ भावेश राजेश जाधव (वय २२) हा तरुण कोंढर काळसुर येथील बीएसएनएल टॉवरच्या अँगलला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ही बाब निदर्शनास येताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भावेशने कोणत्या कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. गुहागर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 12-06-2025














