रत्नागिरी : पुरवणी परीक्षेसाठी शाळामार्फत परीक्षार्थीना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण विभागीय मंडळाअंतर्गत दहावीसाठी १९२ आणि बारावीसाठी ३९७ असे ५८९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविलंब शुल्कासह पुनर्परीक्षार्थीना अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर व कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध देण्यात येणार आहे. www.mahahsscboard. in या संकेतस्थळावर आज (ता. १२) अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. प्रवेशपत्राची प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये तसेच प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. २४ जूनपासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात दहावीसाठी २ हजार ३७७ आणि बारावीसाठी ४ हजार ८२२ असे एकूण ७ हजार १९९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 12/Jun/2025














