चिपळूण : शहरातील उक्ताड ते पेढे बायपास या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली होती. आ. शेखर निकम यांनी यासाठी निधी मंजूर केला असून, नुकतेच रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस जयंद्रथ खताते, तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, मोहम्मद फकीर, किसन चिपळूणकर, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर काझी, जमीर मुल्लाजी, सुधीर भोसले, खालिद दाभोळकर, सचिन साडविलकर, उदय ओतारी, गणेश कांबळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 14/Oct/2024









