आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५

मेष: आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही.

वृषभ: आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे.

मिथुन: आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल.

कर्क: आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा – समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल.

सिंह: आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल.

कन्या: आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील.

तूळ: आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील.

वृश्चिक: आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल.

धनु: आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील.

मकर: आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट – कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल.

कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल.

मीन: आजचा दिवस व्यापार – व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 12-06-2025