रत्नागिरी : शिवाजीनगर परिसरात आर्थिक व्यवहारातून एकाला दगडाने मारहाण

रत्नागिरी : आर्थिक व्यवहारातून एकाला दगडाने मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. शिवाजीनगर परिसरात घडली.

हसन एड्रामी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पराग पर्शुराम पाटील (२८, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे.

त्यानुसार, परागने तीन महिन्यांपूर्वी हसनकडून तीन हजार रुपये घेतले होते. त्यातील १ हजार रुपये परागने परत केल्यानंतर २ हजार रुपये शिल्लक होते. दरम्यान, शुकवारी सकाळी पराग शिवाजीनगर परिसरात हसनला भेटल्यानंतर हसनने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तेव्हा परागने त्याला तू माझ्या गाडीची चावी का काढलीस असे विचारले. याचा राग आल्याने हसनने परागला शिवीगाळ करत बाजूचा दगड उचलून डोकयात, पाठीत मारून दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८ (१), ११५(२), ३५२,३५१ (२),३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 14/Oct/2024