राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून चिपळूण नगरपरिषदेचे अभिनंदन

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधीक्षक अनंत मोरे, वैभव निवाते, बापू साडविलकर यांच्या प्रयत्नांमुळे हा पुरस्कार न.प.ला मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, शहर अध्यक्ष रतन पवार, उपाध्यक्ष राकेश दाते, शहर कार्याध्यक्ष रूही खेडेकर, तालुका कार्याध्यक्ष अंजली कदम, शहर उपाध्यक्ष दिनेश लटके, युवक उपाध्यक्ष जुनेद मेमन, संदेश किंजळकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 14/Oct/2024