Breaking : अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं; नागरी वस्तीतच विमान क्रॅश

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं हे विमान असल्याचे समजते.

घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 12-06-2025