रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव गावातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तेथून प्रवास करणेही जिकिरीचे ठरत आहे. शिरगावातील अंतर्गत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिरगाव गावातील गणेशनगर परिसरातील तसेच आजूबाजूच्या काही वाड्यांमधील प्रमुख रस्ते यांच्यावरती खड्डे पडले असल्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शिरगाव हे गाव रत्नागिरी शहराच्या जवळ असल्यामुळे लोकांना रत्नागिरी शहरांमध्ये ये-जा करावी लागत असते.
त्याचप्रमाणे शिरगाव मध्ये फिशरिज कॉलेजदेखील आहे. येथे येणारे विद्यार्थीदेखील रोज रत्नागिरीतून येऊन जाऊन करतात. रत्नागिरी शहराचे लगतच हे गाव असल्यामुळे या गावालासुद्धा हळूहळू शहराचे रूप येऊ लागले लागले आहे. गावामध्ये नव्या इमारती उभारल्या जात आहेत; पण रस्त्यांची दुरवस्थाच आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्याचे सर्वेक्षण करून खड्डे भरून अथवा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 12/Jun/2025














