दापोली : दापोली-खेड मार्ग हा गेले अनेक दिवस ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे अडचणीत सापडला आहे. सहा महिन्यांपूर्वी दापोली खेड या मार्गाचे नव्याने डांबरीकरण, रुंदीकरण असे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांचा या कामांत नियोजनबद्धपणा नसल्याने वाहन चालकांना रोजच खस्ता खाव्या लावत आहेत.
या मार्गात ठिकठिकाणी आपत्कालीन स्थिती आहे या बाबत एका वृत्तपत्राने आवाज उठवला होता. त्या नंतर या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र चार-आठ दिवसात हे खड्डे पुन्हा उखडले आहेत. टाळसुरे नजीक रस्त्यावर पडलेल्या खड्यात रोजच दुचाकीस्वार आदळत आहेत. तरी ही संबधीत खाते आणि ठेकेदार यांना जाग येताना दिसत नाही. त्यामुळे या रस्ताच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत.
वाकवली बाजारपेठ असलेल्या मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अनेक दिवस खितपत पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी उन्हवरे वाकवली फाट्यावर रोजच वाहतूक कोंडी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 13/Jun/2025














