सापुचेतळे येथे चोरटी दारू विक्री; पोलिसांनी धडक कारवाई करत १२ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लांजा : लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील लिंबूचीवाडी येथे एका घरात सुरू असलेल्या काम चालू असलेल्या आणि कोणीही राहत नसलेल्या घरातून १२,३९० रुपयांची गावठी हातभट्टीची आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हि धडक कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लांजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी नितेश नवनाथ पोशि/१५७७ यांनी सापुचेतळे, लिंबूचीवाडी येथे छापा टाकला. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राकेश रामचंद्र गोरे (वय २९, रा. वाडीलिंबु, सापुचेतळे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हा आपल्या बांधकाम सुरू असलेल्या आणि कोणीही राहत नसलेल्या घरात चोरटा दारू विक्रीचा व्यवसाय करत होता.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत, राकेश गोरे याच्या ताब्यातून विविध प्रकारची दारू आणि गावठी हातभट्टीची दारू असा एकूण १२,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

८ सीलबंद बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) मॅकडॉल लेबल असलेल्या, किंमत १,२८० रुपये.
९ सीलबंद बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) रॉयलस्टेंग लेबल असलेल्या, किंमत १,७१० रुपये.
५ सीलबंद बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) रॉयल चॅलेंज लेबल असलेल्या, किंमत ९५० रुपये.
१० सीलबंद बाटल्या (प्रत्येकी ९० मिली) मॅकडॉल लेबल असलेल्या, किंमत ८५० रुपये.
६ सीलबंद बाटल्या (प्रत्येकी ९० मिली) रॉयल चॅलेंज लेबल असलेल्या, किंमत ६०० रुपये.
७० लिटर गावठी हातभट्टीची दारू, किंमत ७,००० रुपये.
पोलिसांनी राकेश रामचंद्र गोरे याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुरनं. १२०/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत. बेकायदेशीर दारू विक्रीवर लांजा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू माफियांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 13-06-2025