कोकण सहसंयोजक पदवीधर प्रमुख पदी अजय दळवी यांची नियुक्ती

मंडणगड : दळवी शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अजय दळवी यांची भारतीय जनता पक्षाचे कोकण सहसंयोजक पदवीधर प्रमुख या पदावर नियुक्त झाली आहे. दळवी हे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र व उच्च शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील पदव्या व रोजगारही मिळवून दिला आहे. तालुक्याच्या विकासाचे व्हीजन असलेले व येथील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा याकरिता काम करीत असलेले युवा नेतृत्व म्हणूनही ते परिचित आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांकरिता त्यांच्याकडे संघटन करण्याची जबाबदारी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 14/Oct/2024